Chennai company car gift : चेन्नईतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच भव्य भेटवस्तू देत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Chennai company car gift

Latest News : चेन्नईतील ‘टीम डिटेलिंग सोल्युशन्स’ या कंपनीने दिवाळीपूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या अनोख्या भेटीमुळे सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. ही कंपनी स्टील डिझाइन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी यंदा त्यांच्या २८ कर्मचाऱ्यांना कार आणि २९ कर्मचाऱ्यांना बाईक भेट म्हणून दिली आहे. या गाड्यांमध्ये ह्युंदाई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या कारचा समावेश आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधरन कन्नन यांनी या निर्णयाबद्दल सांगितले की, “आमचे कर्मचारीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहेत. त्यांच्यामुळेच कंपनी यशस्वी झाली आहे आणि त्यामुळे त्यांना प्रेरित करण्यासाठी आम्ही त्यांना या भेटी दिल्या आहेत.”

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाचा सन्मान
टीम डिटेलिंग सोल्युशन्स कंपनीत एकूण १८० कर्मचारी कार्यरत आहेत. यातील प्रत्येकजण त्यांच्या कार्यात निपुण असून, कंपनी दरवर्षी आपल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास सन्मान देते. २०२२ मध्येही कंपनीने दोन कर्मचाऱ्यांना कार भेट म्हणून दिली होती. मात्र, यावर्षी त्यांनी ही संख्या वाढवत २८ कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या आहेत.

मर्सिडीज बेन्झचा समावेश
कंपनीने दिलेल्या कारमध्ये मर्सिडीज बेन्झसारख्या महागड्या गाड्यांचाही समावेश आहे. यावर कन्नन यांनी सांगितले, “आम्ही कर्मचाऱ्यांसाठी ठरावीक बजेट ठेवतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याला गाडी नको असेल, तर त्याला त्या बजेटचा रक्कम दिला जातो. शिवाय, तो त्याच्या पसंतीची गाडी निवडू शकतो.”

कर्मचाऱ्यांसाठी खास सवलती
टीम डिटेलिंग सोल्युशन्स केवळ वाहन भेटीच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या गरजांनाही प्राधान्य देते. “कंपनी कर्मचाऱ्यांच्या लग्नासाठी ५०,००० रुपये देत होती, परंतु आता ही रक्कम १ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.” असे ही कन्नन यांनी सांगितले

या निर्णयामुळे कंपनीचे नावलौकिक व कर्मचार्यांच्या जीवनात एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे.

Leave a Reply