मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेनंतर सिडकोची घरे होणार फ्री होल्ड, प्रस्ताव सिडको अध्यक्षांकडून पाठवला

CIDCO Homes and Plots to Become Freehold; Relief for 25,000 Homeowners

सिडकोवासीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये सिडकोच्या घरांना आणि प्लॉट्सना फ्री होल्ड करण्याची घोषणा केल्यानंतर आता सिडकोच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संदर्भात अधिकृत प्रस्ताव पाठवला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी याची माहिती दिली आहे.तिदमे यांनी सांगितले की, सिडकोची घरे आणि प्लॉट्स लीज होल्ड असल्यामुळे घरमालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. घरांवर कर्ज मिळत नव्हते, तसेच बांधकामासाठी परवानगी मिळवणे हेही कठीण झाले होते. त्यामुळे, अनेक वर्षांपासून सिडकोवासीयांनी घरे फ्री होल्ड व्हावीत अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच २५,००० सिडको घरमालकांना स्वतःच्या मालकीचा हक्क मिळणार आहे. यासह सिडकोच्या प्लॉट्सवर बांधकाम केलेल्या गृहनिर्माण संस्थांनाही याचा लाभ होईल.

Leave a Reply