महाराष्ट्र होईल आत्ता निरोगी आणि सुदृढ….
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आरोग्य देवता भगवान धन्वंतरी व अश्विनीकुमार मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण-ध्वजारोहण
हिंदू पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी, विष्णू रुपी भगवान धन्वंतरींनी अमृत कलश (कुंभ) वाहून वाहून नेत असताना, चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले, त्यापैकी एक ठिकाण नाशिक आहे. नाशिक पंचवटी येथील अमृताचे धाम असलेले ठिकाण म्हणजे ‘अमृतधाम’ होय. येथे विश्व पंढरी कोल्हापूर येथील सद्गुरु श्री आनंदनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाने समुद्रमंथनातील अमृत घेऊन येणारी आरोग्याची देवता म्हणजे भगवान धन्वंतरी व देवांचे वैद्य अश्विनौ कुमार यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अमृता सारखे सर्वांना निरोगी आयुष्य मिळावे या उद्देशाने अमृतधाम प्रभागांमध्ये नाशिक जिल्ह्यातील पंचकर्माचे सुसज्ज असे आयुर्वेदाचे पहिले हॉस्पिटल “श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल” सुरू होत आहे, या ठिकाणी सर्वांना शारीरिक व मानसिक निरोगी आयुष्य मिळावे व सुदृढ शरीर संपत्ती मिळावी यासाठी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी व देवांचे वैद्य भगवान अश्विनौ कुमार यांच्या काळ्या पाषाणातील मुर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील हे भगवान धन्वंतरीचे दुर्मिळ असे मंदिर असणार आहे. दक्षिण भारतातील केरळीयन पद्धतीने या मंदिराची व या मुर्तीची रचना केलेली आहे या मुर्तीची स्थापना करताना अनेक वैज्ञानिक गोष्टींचा विचार केला गेला आहेत. समुद्र मंथनातील १४ रत्नांनी युक्त अश्या काळ्या पाषाणात बनवलेली भगवान धन्वंतरीची मुर्ती शुद्ध बध्द पारद युक्त आहे. अश्या प्रकारे वैज्ञानिक स्वरूपात स्थापित केल्या जाणाऱ्या मुर्तीच्या फक्त दर्शनाने व प्रभावाने मनुष्य देहाचे सर्व दोष निर्हरण होतील. समस्त मानवाचे शारीरिक आणि मानसिक विकार बरे व्हावे या उद्देशाने “श्री हरीवल्लभआयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलची” निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी भगवान धन्वंतरीची मुर्ती माता लक्ष्मी-भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या स्वरूपात मुर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र दत्तधाम पीठ गोवर्धन येथील श्री दत्तदास महाराज यांच्या हस्ते या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण आणि ध्वजारोहण होणार आहे. तरी या ऐतिहासिक समारंभाला आपण सर्वांनी उपस्थित राहून या आरोग्य देवतेचे दर्शन घेऊन ह्या परमेश्वर शक्तीकडे सुदृढ आरोग्याची प्रार्थना करूया…
- कार्यक्रम पनिका *
धार्मिक व आयुर्वेदिक कार्यक्रम रूपरेषा - दि. ३० मार्च २०२५ श्री मूर्तीची भव्य मिरवणूक (ग्राम प्रदक्षिणा ) मिरवणूक आकर्षण ढोल पथक, फटाक्यांची आतिषबाजी
- दि. ३१ मार्च २०२५ सर्व देव आवाहन
- दि. १ एप्रिल २०२५ यज्ञ
- दि. २ एप्रिल २०२५ मूर्ती स्थापना
सामान्य जनतेसाठी मोफत आयुर्वेदिक शिबिर
- आयुर्वेदिक घरगुती औषधी प्रदर्शन
- वेळ *सकाळी १० ते ५ वा. पर्यंत
- मोफत आरोग्य शिबिर
मोफत तपासणी पंचकर्म मार्गदर्शन - मोफत सुवर्णप्राशन
- विशेष पंचकर्म व सौंदर्य प्रसादणे कुपन्स वाटप (विशेष सुट)
- आयुर्वेद प्रदर्शन – आध्यात्मिक आधिभौतिक-आधिदैविक आयुर्वेद प्रकार
वैद्यासाठी आयुर्वेदिक शिबीर (संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत)
- भगवान धन्वंतरी व भगवान अश्विनौ कुमार यांनी सिध्द केलेल्या सर्व औषधीचे निर्माण कार्यशाळा व वैज्ञानिक आयुर्वेदीय संभाषण
- वैद्यांमार्फत धन्वंतरी यंत्र सिध्दी व जप
- आयुर्वेदीय यंत्र-शस्त्र प्रदर्शन
- धन्वंतरी व अश्विनौ कुमार व्याख्यान वैद्य अभिजित सराफ
सांस्कृतिक कार्यक्रम (संध्याकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत)
- बासरी वादन
- समुद्र मंथन कथ्थक सेवा
- दीपोत्सव
- आयोजक व आमंत्रक *
वैद्य जीवन जाधव
BAMS (MD Scholar)
आयुर्वेदवाचस्पती, योग विशेषज्ञ
वैद्य स्नेहल जाधव
BAMS (MD)
आयुर्वेदवाचस्पती, सौंदर्य विशेषज्ञ
डॉ. निनाद साळुंके व संपूर्ण हरिवल्लभ गुरुकुल वैद्य विद्यार्थी व कर्मचारी
श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल व गर्भसंस्कार केंद्र, नाशिक
प्लॉट नं. १२, हरिवल्लभ आयुर्वेदिक हॉस्पिटल, वरद विनायक मंदिरा समोर, गोपाल नगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक-३. मो. 9130006030