भारताने बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे, आणि या मालिकेच्या तयारीसाठी संघ १२ सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानात सराव करणार आहे. गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षक टीमच्या मार्गदर्शनाखाली हा संघ तयार करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या संघात दुलीप ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संघात तीन विकेटकीपर बॅट्समनचा समावेश आहे, ज्यामुळे बॅटिंग आणि कीपिंगची मजबूती वाढली आहे.
भारतीय संघात रोहित शर्मा कॅप्टन म्हणून काम पाहणार असून, संघात काही अनुभवसंपन्न खेळाडूंसह तरुण चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. निवडलेला संघ खालीलप्रमाणे आहे:
- रोहित शर्मा (कॅप्टन)
- यशस्वी जैस्वाल
- शुभमन गिल
- विराट कोहली
- केएल राहुल
- सर्फराज खान
- ऋषभ पंत
- ध्रुव जुरेल
- आर अश्विन
- आर जडेजा
- अक्षर पटेल
- कुलदीप यादव
- मोहम्मद सिराज
- आकाश दीप
- जसप्रीत बुमराह
- यश दयाल
या संघाकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा असून, कसोटी मालिकेत रोमांचक क्रिकेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.