नाशिक (Saptashrungi Road Update) – Dangerous Road Nashik नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगड-नांदुरी घाट रस्त्यावर सध्या सुरू असलेले काँक्रिटीकरण, संततधार पाऊस आणि अपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमुळे भाविक व पर्यटकांसाठी जीवघेणं संकट निर्माण झालं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही अडथळ्याचा सामना करावा लागत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Dangerous Road Nashik – एकेरी मार्ग, अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडी
सिंहस्थ 2027 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक–सप्तशृंगगड रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या कामासाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, सध्या घाट परिसरात काम सुरू आहे.
- त्यामुळे रस्ता एकेरी करण्यात आला आहे
- बस, ट्रक, टेम्पो यांसारख्या मोठ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे
- अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो
पाऊस, धुकं आणि मातीमिश्रित रस्त्यांमुळे प्रवास कठीण
सप्तशृंगगड परिसरात सतत पावसामुळे रस्ता निसरडा झाला आहे, तर धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची कमी झाली आहे. वळणदार घाट मार्गावर माती व चिखल जमा झाल्यामुळे वाहन चालवताना अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.
- रात्री अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे
- रस्ता पूर्णपणे सुरक्षित न झाल्यामुळे घातक परिस्थिती कायम
धबधब्याजवळ सेल्फी घेताना जिवाशी खेळ
पावसामुळे घाटात धबधबे वाहू लागले आहेत, जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र,
- लोखंडी कुंपणाचा अभाव
- स्लिपरी दगड, वाहून आलेली माती
यामुळे येथे पाय घसरून पडण्याची आणि अपघात होण्याची शक्यता आहे.
सुरक्षेच्या मागण्या – ग्रामपंचायतीकडून प्रशासनाकडे पाठवलेले प्रस्ताव
- घाटात रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक लावावेत
- सुरक्षा कठडे व कुंपणाची उभारणी करावी
- काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे
- धबधब्याजवळ पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करावे
सप्तशृंगगड घाट रस्ता सध्या अर्धवट काम, धोकादायक वळणं, पावसामुळे घसरणारा चिखल आणि अपूर्ण सुरक्षा यंत्रणा यामुळे प्रचंड धोकादायक बनला आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही.