स्कुबा डायव्हरच्या मदतीने दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; विल्होळी दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सिडको (नाशिक) : Death by Drowning in Nashik नाशिक तालुक्यातील विल्होळी पाझर तलावात मासेमारी करताना एका ३२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२५ जून) सायंकाळी घडली. मृत युवकाचे नाव लक्ष्मण दशरथ जाधव असे आहे. गुरुवारी (२६ जून) दुपारी स्कुबा डायव्हर गोविंद तुपे व स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह सापडला.
घटनेचे तपशील – पाण्यात बुडण्याची दुर्घटना (Death by Drowning in Nashik)
बुधवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास लक्ष्मण जाधव आपल्या दोन मित्रांसह मासेमारीसाठी तलावात गेला होता. मासे पकडताना तो पाण्यात बुडाला. मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रात्रभर शोधमोहीम; संतप्त नातेवाइकांचा रास्ता रोको
आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. मात्र पाऊस आणि अंधारामुळे अडथळे निर्माण झाले. मृतदेह सापडत नसल्याने संतप्त नातेवाईकांनी मध्यरात्री नाशिक-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन स्थगित केले.
स्कुबा डायव्हर गोविंद तुपेची महत्त्वाची भूमिका
गोविंद तुपे, हा अनुभवी स्कुबा डायव्हर, त्याच्याकडे पूर्ण बचाव उपकरण असल्याने त्याची मदत घेण्यात आली. तो त्या दिवशी अहिल्यानगरजवळील दिंडीत सहभागी झाला होता. रात्री माहिती मिळताच तो त्वरित घटनास्थळी पोहोचला आणि गुरुवारी दुपारी मृतदेह शोधून काढण्यात यशस्वी ठरला.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.