एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

Eknath Shinde

एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पण सरकारने सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते उपस्थित होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावे आणि महागाई भत्ता मिळावा तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घर भाडे भत्ता मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांचे वेतन वाढ मिळावे अशा प्रकारच्या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गेल्या दोन दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे राज्यातील वाहतूक विस्कळीत झाली आणि या संपामुळे एन गणेशोत्सवात प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. आता संप मागे घेतल्यामुळे लालपरी रस्त्यावर पुन्हा धावणार.

Leave a Reply