मुर्तीजापुर परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना; घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज संतप्त

मुर्तीजापुर परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना; घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज संतप्त

मुर्तीजापुर परभणी या ठिकाणी समाजकंटक नालायक देशद्रोही “सोपान दत्ताराव पवार” या नराधमाने परभणी येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची हेतू पुरस्कर तोडफोड करून विटंबना केली, याच घटनेचे पडसाद आज १२ डिसेंबर रोजी, नाशिक मध्ये ही उमटताना दिसत आहे. समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने, महसूल विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त व नाशिकरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत. आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. सदरच्या निवेदन म्हटले आहे की. या कृत्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या आणि संविधान प्रेमींच्या भावना तिव्र दुखविल्या असुन, त्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. ज्या समाजकंटकाने हे कृत्य केले आहे. हे कोणाच्या सांगण्याने केले. या कृत्याचा मास्टरमाईंड कोण..? त्यांच्यावर आरोपी नराधम समाजकंटक “सोपान दत्ताराव पवार” यांच्यावर देशद्रोहाचा कठोर स्वरुपाचा गुन्हा दाखल करून, सदर घटनेमध्ये जे- जे आरोपी आहेत. त्यांची सखोल चौकशी करीत‌. त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई त्वरित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षातील विविध संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष, वंचित बहुजन आघाडी, सकल हिंदू समाज, सकल मातंग समाज, भीम आर्मी, आझाद समाज पार्टी, मिलन मित्र मंडळ, आदि विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होत निषेध व्यक्त केला. यावेळी- अर्जुन पगारे, आकाश भालेराव, अमोल पगारे, चंद्रकांत भालेराव, समीर शेख, भारत निकम, दामोदर पगारे, संतोष पाटील, बंटी थोरात, अमोल आल्हाट, अशोक गायकवाड, सोनु नागरे, विशाल घेगडमल,अजय जाधव, किशोर कटारे, बाळासाहेब भालेराव,आदिसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.