धाराशिव जिल्ह्यात भूम येथे अर्धनग्न तिरडी आंदोलन: सरकारच्या विरोधात मराठा बांधवांचे तीव्र आंदोलन

Half-Naked Bier Protest in Bhoom, Dharashiv: Maratha Community's Intense Protest Against the Government

धाराशिव: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे आज सकल मराठा समाजाकडून अर्धनग्न होऊन तिरडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भूम शहरातील मुख्य रस्त्यावर घोषणांच्या गजरात हे आंदोलन पार पडले.आंदोलकांनी जोरदार इशारा दिला की, जर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात आल्या नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत असून धाराशिव, तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, परंडा आणि वाशी या शहरांमध्येही बंदचे पडसाद उमटले आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply