Dr. Hemlata Patil Emotional Memories : डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेसला रामराम; आठवणींचा गहिवर सोशल मीडियावर व्यक्त

Dr. Hemlata Patil Emotional Memories

नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील (Dr. Hemlata Patil) यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडल्याने त्या नाराज होत्या. पक्षातील गटबाजी आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Dr. Hemlata Patil : शिंदे गटात जाण्याचा विचार

काँग्रेससोबतची वर्षानुवर्षांची नाळ तोडताना त्यांना भावनिक गहिवर आला. त्यांनी सोशल मीडियावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जुन्या आठवणी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षात मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, त्यांनी शिंदे गटात जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.

https://www.facebook.com/reel/605519682098169

समर्थकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

त्यांच्या या निर्णयावर समर्थक आणि राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले, तर काहींनी “त्यांनी विचारधारा बदलू नये” अशी प्रतिक्रिया दिली.

डॉ. हेमलता पाटील यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!