नाशिक रोड, प्रतिनिधी:गांधीनगर येथील ऐतिहासिक रामलिलेच्या ६९ व्या पर्वाचा शुभारंभ गांधीनगर प्रेसचे मुख्य व्यवस्थापक बन्सीधर दुबे आणि नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष सुदाम गायकवाड यांच्या हस्ते झाला. या रामलिलेचा उद्घाटन सोहळा अमाप उत्साहात पार पडला. रामलिला समितीचे महासचिव कपिलदेव शर्मा, दिग्दर्शक संजय लोळगे आणि अन्य प्रतिष्ठित सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पहिल्या दिवशी ‘रावण-कुंभकर्ण-विभीषण वरदान’, ‘राम जन्म‘, ‘सीता जन्म’, ‘डाकू रत्नाकर‘ या प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. रामायणातील विविध महत्वाचे प्रसंग दस-यापर्यंत सादर केले जाणार आहेत. राम-रावण यांच्यातील भीषण युद्ध, आणि दस-याला रावणवधाने रामलिला समारोप होणार आहे.
या रामलिलेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्माचे कलाकार यात सहभागी होतात आणि नामवंत कलाकार मानधन न घेता भूमिका साकारतात.
याच मैदानाजवळ बंगाली समाजाने दुर्गा पूजेसाठी भव्य मंडप उभारला आहे. यंदा दुर्गा पूजेचे ७१ वे वर्ष असून, अष्टमीपासून दुर्गा पूजेचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होणार आहेत. अष्टमी, नवमी आणि दस-याच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देवीच्या मूर्ती कोलकत्यातील हुबळी नदीच्या मातीपासून बनविण्यात आल्या असून, त्या नाशिकमधील बंगाली कलाकारांनी घडविल्या आहेत.