१) भरपूर पाणी प्या : भरपूर पाणी प्यावे, जेणे करून आंतरिक स्वच्छता होऊन शरीरातील घाण बाहेर पडून शरीरात नव्या पेशींची निर्मिती होते, आणि त्वचा तजेल होते.
२) ताजे रस प्या : दर रोज कमीत कमी २ ग्लास ताज्या फळांचा रस प्यायला पाहिजे. रस त्वचेला पोषण देऊन त्वचेला तेजवान आणि सुंदर करते.
३) चांगली झोप : आपण नेहमीच कामाच्या ताण तणावात असतो. त्यामुळे थकवा येतो आणि झोप पण पुरेशी होत नसल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्यासाठी किमान ८ तासाची झोप हवी.
४) लिंबू : आहारात लिंबाचा वापर करावा. लिंबात व्हिटॅमिन-सी चा समावेश असतो. व्हिटॅमिन-सी शरीरातील घाण बाहेर काढण्यात मदत करते. लिंबाच्या रसाला सॅलडवर टाकून सेवन करावे किंवा
गरम पाण्यात देखील घेऊ शकता.
५) अक्रोड : अक्रोड मध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड असते. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. अक्रोडाच्या तेलाने त्वचेवर मालिश केल्याने त्वचेचा रंग उजळून तारुण्य येते.
६) संत्री : संत्रीमुळे त्वचा उजळते. संत्र्याच्या रसाचे सेवन केल्यास त्वचेला फायदा होतो. तसेच संत्र्याच्या सालीची पेस्ट बनवून लावल्याने त्वचा तजेल आणि चमकदार होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.