नाशिकमध्ये सारथीच्या १५६ कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन; मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

Foundation Stone Laid for ₹156 Crore SARTHI Projects in Nashik by CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis

नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन समारंभ नुकतेच पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत १५६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सारथीच्या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, व ५०० मुलांचे व ५०० मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले. यासोबतच धनगर समाजातील १०० विद्यार्थी आणि १०० विद्यार्थिनींसाठी ४३ कोटी रुपये खर्चून वसतिगृह व कार्यालय इमारतीच्या तसेच २५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचेही भूमिपूजन झाले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

समारंभात आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार हेमंत गोडसे आणि सकल मराठा समाज व धनगर समाजातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकल मराठा व धनगर समाजाच्या बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला.

कार्यक्रमात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या विकासकामांवर आधारित “विकास पर्व” या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

Leave a Reply