Fraud Godman : भोंदूबाबाचा फसवणुकीचा पर्दाफाश! ग्राहक आयोगाचा ऐतिहासिक निकाल

Fraud Godman Black Magic Scam Online Ritual Fraud Consumer Commission Verdict

नाशिकच्या महिलेला ऑनलाईन पूजा विधीने फसवले

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Fraud Godman : नाशिकच्या एका महिलेची जादूटोणा व भूतबाधा दूर करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका भोंदूबाबाला (Fraud Godman)ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दंड ठोठावला आहे. या निकालामुळे अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) लढ्याला बळ मिळाले आहे.


ऑनलाइन जाहिरातीच्या जाळ्यात महिला अडकली

नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील करौली बाबा उर्फ संतोष सिंग भरोदिया याची जाहिरात दिसली. “भूतबाधा, काळी जादू, कुटुंबातील आजार एका दिवसात दूर!” असा दावा त्याने केला होता. या जाहिरातीला भुलून महिलेनं आरटीजीएसच्या माध्यमातून 2.51 लाख रुपये पाठवले आणि ऑनलाइन पूजा विधी केली. मात्र, कोणताही फरक न पडल्याने महिलेनं ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली.


महिलेची 50 कोटींची मागणी – आयोगाने दिला दंडाचा आदेश

महिलेनं मानसिक व शारीरिक त्रासाच्या मोबदल्यात 50 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. सुनावणीदरम्यान, ग्राहक आयोगाने भोंदूबाबाला –

  • ₹50,000 दंड
  • ₹15,000 मानसिक त्रासासाठी भरपाई
  • ₹7,000 तक्रार अर्जासाठी खर्च
  • ₹2.51 लाख महिलेचे मूळ पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.

करौली बाबा – जादूटोण्याचा मास्टरमाइंड?

करौलीजवळ 14 एकर जमिनीवर संतोष सिंग भरोदियाने अनधिकृत आश्रम उभारला आहे. तो कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर इलाज करण्याचे दावे करतो. युट्युबवर त्याच्या तंत्र-मंत्राचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याची प्रकरणं त्याच्या विरोधात दाखल आहेत.

अंनिसचा लढा आणि पुढील कारवाई

या निकालामुळे ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अंनिस कार्यकर्त्यांनी करौली बाबावर जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.