Galwan Valley गलवान खोरे: संघर्षातून पर्यटनस्थळाकडे वाटचाल
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक – एकेकाळी भारत-चीन तणावामुळे चर्चेत असलेले गलवान खोरे Galwan Valley आता साहसी पर्यटकांसाठी नवा आकर्षणबिंदू ठरणार आहे. २०२० च्या संघर्षात वीरगती पत्करलेल्या भारतीय सैनिकांचे स्मरण करून देणारे हे ठिकाण आता ‘बॉर्डर टुरिझम’चा भाग म्हणून विकसित केले जात आहे.
‘बॉर्डर टुरिझम’ची घोषणा
जानेवारी महिन्यात ‘आर्मी डे’च्या निमित्ताने केंद्र सरकारने गलवान खोऱ्याला Galwan Valley पर्यटनासाठी खुलं करण्याची घोषणा केली. लडाखपासून २४० किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी साहसी प्रवासाचा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. डोंगर-दऱ्यांमधून जाताना श्योक नदीचे सौंदर्य, दुर्मीळ गोल्डन फिश, जंगली यॉक, स्नो लेपर्ड आणि सिल्क रूटच्या पुरातन खुणा पाहण्याची संधी मिळणार आहे.
सुविधा आणि आकर्षणे
गलवान खोऱ्यात Galwan Valley तंबूच्या स्वरूपात निवासव्यवस्था, कॅफेटेरिया, आणि दुकाने उभारण्यात आली आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या सहकार्याने पर्यटकांसाठी सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. येथे गरम पाण्याचे झरे, करवसुली किल्ला, आणि श्योक नदीचे नितळ पाणी ही प्रमुख आकर्षणे आहेत.
शहिदांचे स्मारक
१९५९ आणि २०२० च्या संघर्षात शहीद झालेल्या वीर सैनिकांचे स्मारक येथे उभारण्यात आले आहे, जे पर्यटकांना देशभक्तीचा अभिमान जागवणारे ठरणार आहे.
परवाने व पर्यटन हंगाम
लष्कराच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने परवाने देण्याचे काम सुरू केले असून, जूनपासून अधिकृत पर्यटन हंगाम सुरू होईल. साहस, निसर्गसौंदर्य, आणि देशप्रेमाचा अनुभव घेण्यासाठी गलवान खोरे पर्यटकांना साद घालत आहे.