ब्राह्ममुहूर्तापासून, म्हणजे पहाटे 4:50 पासून ते दुपारी 1:51 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.फक्त राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वर्ज करावा. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
🌹 श्रीगणेश स्थापना
प्रश्न क्र १ :- गणेश स्थापना मुहूर्त कोणता ?
उत्तर:- गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शु. चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत कधीही स्थापना करता येते . उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल . त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशींचा कालावधि, भद्रा (विष्टि करण), चौघडीया मुहूर्त (अमृत, लाभ) इत्यादि पाहण्याची गरज नाही .
प्रश्न क्र २ :- घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही ?
उत्तर :- याला काहीही शास्त्रीय आधार नाही . आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते , अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्या वेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे , असा भोळा समज त्यामागे आहे .
प्रश्न क्र ३ अशौच ( सोयर व सुतक ) आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का ?
उत्तर :- पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही , त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो , पुढील वर्षी बसवता येतो .
पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शु चतुर्थी हा एकच दिवस असल्याने, त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये. येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही.
प्रश्न क्र ४ :- आता अशौचामुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का ?
उत्तर:- आश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपति पूजन करू नये त्याला काहीही शास्त्राधार नाही . अनेकजण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात . ते पण शास्र मान्य नाही .
प्रश्न क्र ५ यंदा गावी दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का ?
उत्तर :- अडचणीच्या काळात दीड दिवस , तीन , पाच , सात दिवसात विसर्जन करू शकता .
गणेश स्थापना झाल्यावर अशौच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे , अशौच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेऊ नये .
प्रश्न क्र ६:- मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेशमूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली . ते योग्य आहे का ?
उत्तर :- गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे , दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये . जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता .
प्रश्न क्र ७ आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का ?
उत्तर :- चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते . त्यामुळे आरास न करता , साध्या पद्धतीने व भक्ती भावाने गणेश स्थापना करावी .
प्रश्न क्र ८ :- आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपतीचा सण साजरा करतो , पण यंदा जाणे शक्य नाही . आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का ?
उत्तर :- हो , जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत , ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो . प्रतिवार्षिक व महालय श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते .
प्रश्न क्र ९ पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा ?
उत्तर:- घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात , जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे . त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत .
प्रश्न क्र १०:- या वर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक एक असे गणपती बसवले तर चालतील का ?
उत्तर :- गणेशस्थापणा हे एक व्रत आहे , त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले . त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती . त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा . दोन गणेशस्थापणा एकाच घरात करू नये .