पंचवटी मध्ये सुनिल खापरे या राम भक्ताने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या घरी प्रत्यक्ष अयोध्या येथील राम मंदिराची साडेसहा फूट बाय पाच फूट बाय पाच फुटाची भव्य अशी हुबेहूब इको फ्रेंडली प्रतिकृती साकारली आहे हि प्रतिकृती त्यांनी स्वतः घरच्या घरी तयार केली यासाठी त्यांनी पॅकिंग पुठ्ठा कागद आणि लाकुड याचा वापर केला तसेच यामध्ये प्रत्यक्ष रामलल्लाची नऊ इंची मूर्ती गर्भग्रहात विराजमान करून प्रत्यक्ष राम दर्शनाची संधी येथील परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली अतिशय सुंदर अशी प्रतिकृती असून आपण अयोध्या नगरीत आहोत असा भास निर्माण होतो तरी नागरिकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनील खापरे यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.