Palakmatri नाशिक : पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, महाजनांच्या Girish Mahajan नियुक्तीला स्थगितीने गोंधळ वाढवला

Nashik Guardian Minister

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी Palakmantri सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनी सोमवारी (दि. २०) नवा रंग घेतला. भाजपचे संकटमोचक व जलसंपदामंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर होताच काही तासांतच ती स्थगित करण्यात आली. शिंदे सेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

महाजनांचे अभिनंदन आणि संभ्रमाचा गोंधळ
महाजन यांच्या नियुक्तीच्या बातमीनंतर शहरात ठिकठिकाणी त्यांचे अभिनंदन करणारे फलक झळकू लागले. मात्र, शिंदे सेनेच्या नाराजीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष दिवसभर मुंबईतील हालचालींकडे लागून होते.

भुजबळांच्या नाराजीमुळे पालकमंत्रिपदावर Palakmantri संकट?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीमुळे भाजपला नाशिकसाठी पालकमंत्रिपद Palakmantri मिळवण्यात अडथळे आले, असे बोलले जात आहे. शनिवारी गिरीश महाजन Girish Mahajan यांची पालकमंत्री Palakmatri म्हणून घोषणा झाली होती, परंतु शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांचे नाव चर्चेत असल्याने वाद उफाळले.

प्रशासनाचा गोंधळ
प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाच्या यादीत गिरीश महाजन Girish Mahajan यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय न झाल्याने जिल्हा प्रशासन संभ्रमात आहे. या तिढ्याचा निकाल २६ जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे.

शिंदे सेनेची नाराजी
शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते म्हणाले, “दादा भुसे यांच्याकडून जिल्ह्यात चांगले काम सुरु आहे. आम्हाला त्यांचीच पालकमंत्री म्हणून अपेक्षा होती. मात्र नाशिककरांना लवकरच गुड न्यूज मिळेल.”

महाजनांची प्रतिक्रीया
गिरीश महाजन Girish Mahajan म्हणाले, “पालकमंत्रिपदाबाबत काय सुरू आहे, याची मला कल्पना नाही. काही अंतर्गत अडचणी असतील, त्यावर लवकरच तोडगा निघेल.”

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सध्या भाजप-शिंदे सेनेत रस्सीखेच सुरु असून, या वादाचा अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.