मागील आठवड्यात सोन्याच्या दरात चढ-उतार, ग्राहकांमध्ये गोंधळ
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Gold price today in Nashik – सोने-चांदी दरवाढीचा ट्रेंड सुरुच असून, गत आठवड्यातील स्थिती थोडीशी चढ-उताराची राहिली आहे. सोने दरात कधी वाढ, कधी घसरण, तर चांदीने मोठी झेप घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी, ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Gold price today in Nashik)
सोन्याच्या दरात आठवडाभरात चढ-उतार (Gold price today in Nashik)
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठे चढउतार दिसून आले.
- सोमवारी सोने 760 रुपयांनी महागले
- मंगळवारी 600 रुपयांची वाढ नोंदली
- बुधवारी 490 रुपयांनी घसरण, तर
- गुरुवारी पुन्हा 330 रुपयांनी कमी झाले
या चढ-उतारांमुळे सोने ८५ हजारांच्या आसपासच स्थिर आहे, त्यामुळे ८० हजारांच्या खाली येण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकार सांगतात.
दिवाळीत सोने दर ‘लाख’ पार करणार?
सराफ व्यावसायिकांचे मत आहे की, ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत, त्यावरून सोने दर लवकरच एक लाखाच्या टप्प्यावर जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीत सोने महाग होणार, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

चांदीचा वेग अविरत, पुन्हा लाखाच्या जवळ
जरी सोने दर चढ-उतार करत असले तरी चांदीच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली आहे.
- सोमवारी आणि बुधवारी प्रत्येकी 1000 रुपयांची वाढ,
- गुरुवारी आणखी 100 रुपयांची वाढ
आठवडाभरापूर्वी चांदी 5,000 रुपयांनी स्वस्त झाली होती, पण आता चांदी पुन्हा एकदा ‘लाखाच्या उंबरठ्यावर’ पोहोचली आहे, हे विशेष!
सद्यस्थितीत सोने-चांदी दर (10 मार्च 2025)
धातू | दर (प्रति तोळा/किलो) |
---|---|
24 कॅरेट सोने | ₹87,740 तोळा |
22 कॅरेट सोने | ₹80,430 तोळा |
चांदी | ₹99,100 प्रति किलो |