आता नाशिकमधील व्यावसायिकांना मिळणार आपल्या व्यवसायास प्रसिद्धी देण्याची सुवर्णसंधी

महत्त्वाच्या बातम्या आता नाशिकमधील व्यावसायिकांना मिळणार आपल्या व्यवसायास प्रसिद्धी देण्याची सुवर्णसंधी, सिटीलिंकच्या अधिकृत बस स्टॉप बरोबरच तिकीटावर छापता येणार संस्थेचे नाव, शिवाय संबंधित स्टॉपच्या नावासोबतच व्यवसायाचीही करता येणार बसमध्ये घोषणा

आता नाशिकमधील व्यावसायिकांना मिळणार आपल्या व्यवसायास प्रसिद्धी देण्याची सुवर्णसंधी, सिटीलिंकच्या अधिकृत बस स्टॉप बरोबरच तिकीटावर छापता येणार संस्थेचे नाव, शिवाय संबंधित स्टॉपच्या नावासोबतच व्यवसायाचीही करता येणार बसमध्ये घोषणा

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिककरांना सार्वजनिक बससेवा उपलब्ध करून देणेकरिता नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक ची स्थापना करण्यात आली. आणि ८ जुलै २०२१ रोजी नाशिकच्या रस्त्यांवर पहिली सिटीलिंकची बस धावली. अत्याधुनिक, आरामदायी, खिशाला परवडणारे दर, आणि सर्वात महत्वाचे शांत, आल्हाददायक वातावरण असलेल्या या शहराचे प्रदूषण न वाढविणार्‍या सीएनजी बस यामुळे अल्पावधीतच सिटीलिंक बस नाशिककरांच्या पसंतीस उतरली आणि सामान्य नाशिककरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. सद्यस्थितीत रोज लाखो प्रवाश्यांची ने आण सिटीलिंकच्या माध्यमातून होत असते. त्याकरिता २५० बसेस आणि ६९१ बस थांबे नाशिककरांच्या दिमतीला अहोरात्र उभे आहेत.

परंतु आता प्रवासाबरोबरच नाशिककरांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची सुवर्णसंधी देखील सिटीलिंक उपलब्ध करून देत आहेत. नाशिक शहरात सिटीलिंकचे ६९१ अधिकृत बस थांबे असून या बसथांब्यांना आपल्या व्यावसायिक संस्थेचे नाव देण्याची सुवर्णसंधी सिटीलिंकने उपलब्ध करून दिली आहे. बस थांब्याला संस्थेचे नाव देण्याबरोबरच संबधित तिकीटावर देखील स्टॉपबरोबरच संस्थेचे नाव ही छापता येणार आहे. शिवाय संबधित थांबा आल्यास थांब्याबरोबरच व्यावसायिक संस्थेच्या नावाचीही उद्घोषणा करता येणार आहे. म्हणजे एकाचवेळी बसथांब्याला नाव, तिकीटावर नाव व बसमधील उद्घोषणा अशी व्यवसायाची प्रसिद्धी करण्याची त्रीसंधी सिटीलिंकने उपलब्ध करून दिली आहे.

मुख्य म्हणजे रोज लाखो प्रवासी सिटीलिंक बस सेवेचा लाभ घेतात. त्यामुळे आपला व्यवसाय लाखो नाशिककरांपर्यंत पोहोचविण्याची ही संधी सिटीलिंक देत आहे. त्यामुळे व्यावसायिक नक्कीच या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकतात.

यासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे, नियमावली, सविस्तर माहिती सिटीलिंकच्या www.citilinc.nmc.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मग आजच या वरील संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या व्यावसायिक संस्थेला प्रसिद्धी देण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

Leave a Reply