शिव स्वराज्य यात्रेचा नाशिकमध्ये उत्साहात समारोप: जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांचा सत्कार

Grand Conclusion of 'Shiv Swarajya Yatra' in Nashik: Jayant Patil and Amol Kolhe Honored

नाशिक रोड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) राज्यभरात आयोजित ‘शिव स्वराज्य यात्रा’चा समारोप नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मोठ्या उत्साहात झाला. या समारोप सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या कार्यक्रमात नाशिक रोड येथील आयएसपी-सीएनपीमधील प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस आणि कामगार नेते जगदीश गोडसे यांनी पाटील व कोल्हे यांचा सत्कार केला. यावेळी, प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्याकडे नाशिक विधानसभा पूर्व मतदारसंघातून जगदीश गोडसे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. जयंत पाटील यांनी या विषयावर गोडसे यांच्याशी चर्चा केली.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शेलार, कोंडाजीमामा आव्हाड, गोकुळे पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख, मुन्नाभाई अन्सारी, अशोक पाटील मोगल, संजय गालफाडे, सचिन आहेर, समाधान कोठुळे, संतोष जगताप आणि किरण पानकर उपस्थित होते.

चर्चेदरम्यान, जगदीश गोडसे यांनी पूर्व मतदारसंघात राबवलेल्या सामाजिक उपक्रमांची, प्रेस कामगारांसाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणाची माहिती दिली. कार्यक्रमानंतर गोडसे यांनी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांचा प्रेस मजदूर संघातर्फे पुष्पहार घालून सत्कार केला. या वेळी गोडसे यांनी त्यांना गांधी टोपीही भेट दिली, ज्यावर शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि जगदीश गोडसे यांची छायाचित्रे होती. ही टोपी उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

Leave a Reply