प्रतिनिधी, इंदापूर: हर्षवर्धन पाटलांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दाखवली असून, तुतारी हाती घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
हर्षवर्धन पाटलांनी उद्या इंदापूर येथे पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ते आपल्या पुढील राजकीय पाऊलाबद्दल मोठा खुलासा करू शकतात. ही पत्रकार परिषद उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे.
तुतारीची घोषणा आधीच हर्षवर्धन पाटलांच्या मुलगा आणि मुलीने स्टेटसवर ठेवून संकेत दिले होते, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पाटलांनी भाजपसोबतच्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे, असे सुत्रांकडून समजते.
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.