शेतकऱ्यांचा ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

**Headline:** Farmers Show Overwhelming Response to 'Solar Pump on Demand' Scheme; 1.22 Lakh Registrations in 14 Days

राज्य सरकारच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महावितरणच्या वेबसाईटचे उद्घाटन झाल्यानंतर केवळ चौदा दिवसांत १,२२,४२१ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

*जालना जिल्ह्याने बाजी मारली या योजनेत जालना जिल्ह्याने सर्वाधिक ५२,०६७ अर्ज दाखल केले आहेत, तर मराठवाड्यातील बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, आणि हिंगोली जिल्ह्यांनी देखील महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे.

**योजनेचे फायदे**

या योजनेत, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे सौर कृषी पंप मंजूर केले जातात. शेतकऱ्यांना केवळ १०% रक्कम भरून पंप मिळू शकतो, तर अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा केवळ ५% आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून सबसिडीच्या रूपात दिली जाते.

**अर्ज करण्यासाठी वेबसाईट

**शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा.

Leave a Reply