पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिकांना संदेश – रिफाइंड तेल टाळा, पारंपरिक तेल वापरा
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Health risk :देशात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या समस्येमागे अनेक कारणांपैकी एक मोठे कारण म्हणजे रोजच्या आहारातील खाद्यतेलाचा प्रकार आणि प्रमाण (Health risk) . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण संदेश दिला – “रिफाइंड तेल खाणे टाळा आणि आरोग्यदायी पारंपरिक तेलांचा वापर करा.“
नाशिकमध्ये दररोज ५०,००० किलो खाद्यतेलाचा वापर (Health risk)
सुमारे २० लाख लोकसंख्या असलेल्या नाशिक शहरात दररोज ५० हजार किलो खाद्यतेलाचे सेवन केले जाते. प्रतिव्यक्ती सरासरी ७० ते ८० ग्रॅम तेलाचा दररोज वापर करत असल्याचा अंदाज आहे. यामुळे शरीरातील चरबी आणि हृदयविकाराचा धोका वाढत आहे.
एका कुटुंबाला महिन्याला किती तेल लागते?
चार सदस्यांच्या कुटुंबाला महिन्याला सरासरी ४.५ ते ५ लिटर तेल लागते. पवननगरमधील नितीन पाटील पवार यांनी सांगितले की, “आम्ही महिन्याला ५ लिटर सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल वापरतो.”
कोणते तेल आरोग्यासाठी योग्य?
पंतप्रधान मोदी यांच्या मते, रिफाइंड तेल टाळून शेंगदाणा, सोयाबीन, तीळ किंवा सूर्यफूल तेल वापरले पाहिजे. यामध्ये नैसर्गिक घटक असतात, जे हृदयासाठी सुरक्षित असतात.
“ज्या वस्तू तोंडाने खाऊ शकतो, त्याच वस्तूचे तेल वापरायला हवे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
वयानुसार तेलाचे प्रमाण किती असावे?
- ४० वर्षांवरील व्यक्तींनी दररोज १५ ते २० एमएल तेलाचे सेवन करावे.
तेलाच्या निवडीत बदल – रिफाइंडला नाही, पारंपरिक तेलांना हो
नाशिकमधील होलसेल व्यापाऱ्यांनुसार,
- ६०% लोक सूर्यफूल तेल वापरतात
- २०% सोयाबीन तेल वापरतात
- उर्वरित २०% लोक करडीतेल, शेंगदाणा, सरकी, राईस बॅन, पामतेल आणि सरसो तेल वापरतात.
पॅकिंग आणि सुट्टे तेलाचे प्रमाण
- ५०% तेल पॅकिंग स्वरूपात
- ५०% तेल सुट्ट्या स्वरूपात विकले जाते
खाद्यतेलाचे दर वाढल्याने नागरिकांची पसंती बदलतेय
गेल्या काही महिन्यांपासून शेंगदाणा व सोयाबीन तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी सूर्यफूल तेलाकडे अधिक झुकाव दाखवला आहे.
करडी व शेंगदाणा तेलाचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांची निवड बदलली आहे.