नाशिकमध्ये NCC कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती

Traffic Awareness Camp Held for NCC Students in Nashik

नाशिक (प्रतिनिधी): मीनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी येथे महाराष्ट्र NCC बटालियनच्या वतीने २०० विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती” शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम लेफ्टनंट कर्नल करूवा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

सदर कार्यक्रमात नाशिक शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त . सुधाकर सुरडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतूक नियमनाचे महत्त्व तसेच अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. वाहतूक पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन (PPT) व व्हिडिओच्या माध्यमातून हेल्मेट वापर, सीट बेल्ट बांधणे, सिग्नलचे पालन, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये याबाबत माहिती दिली.

तसेच, वाहतूक शाखेत वापरण्यात येणारे आधुनिक उपकरणे जसे की बॉडी वॉर्न कॅमेरा, ई-चलन मशीन, टिंट मीटर, ब्रेथ एनालायझर, एलईडी बॅटन, साऊंड लेवल मीटर यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या उपकरणांची माहिती लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी NCC प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

Leave a Reply