दुलीप ट्रॉफी २०२४-२५ हंगामाच्या दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सच्या खेळाडू इशान किशन, तिलक वर्मा आणि अंशूल कंबोज यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विशेषतः तिलक वर्माने भारत अ संघाकडून खेळताना १९३ चेंडूंत १११ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याच्याबरोबर शाश्वत रावतनेही ६४* धावा काढून चांगली साथ दिली. तिलक वर्माचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले असून, त्यामुळे त्याने भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मजबूत दावेदारी दाखवली आहे.भारताला २०२५ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळायची असून त्याआधी १० कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत तिलकसारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीने निवड समितीसमोर नवीन पर्याय उभे केले आहेत. अनंतपूरच्या मैदानावर तिसऱ्या दिवशी भारत अ संघासाठी सलामीवीर प्रथम सिंगनेही १२२ धावांची शतकी खेळी केली, ज्यामध्ये १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तिलकने रियान परागसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली, आणि नंतर शाश्वत रावतसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद ११६ धावा जोडल्या. भारत अ संघाने ३ बाद ३८० धावांवर दुसरा डाव घोषित करून भारत ड संघासमोर ४८८ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.