नाशिक रोड येथील आय.एस.पी/सी.एन.पी. वेल्फेअर फंड कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला आहे. या उत्सवात पोलीस स्टेशन शेजारील मेनगेट मैदानावर भव्य जेजुरी गडाचा देखावा उभारण्यात आला आहे, जो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या प्रसंगी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी . जगदीश गोडसे यांनी सपत्नीक विघ्नहर्त्याची पूजा अर्चा केली. सोबतच गणेशोत्सवाच्या आयोजनात विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे, डॉक्टर संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, बबन सौद, निवृत्ती कदम, राजू जगताप, मनीष कोकाटे, संदीप व्यवहारे, शैलेश जाधव, विनोद गांगुर्डे, समाधान भालेराव, सतीश चंद्रमोरे, बाळकृष्ण सानप, राजेंद्र वारुंगसे, संपत घुगे, सचिन चिडे आणि वेल्फेअर सोसायटीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत निलेश जाधव, अण्णा सोनवणे, सुधीर पगारे, आप्पाजी जगताप, श्रीपाद काजळे, मुरलीधर जगताप, दत्तात्रय टिळे आणि मच्छिंद्र जाधव यांनी केले.