Jammu Kashmir encounter : जम्मू-काश्मीर चकमक: शूरवीर जेसीओ कुलदीप चंद शहीद, ३ जैश-ए-मोहम्मद दहशतवादी ठार

Jammu Kashmir encounter

अखनूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; किश्तवाडमध्ये ऑपरेशन छत्रू अंतर्गत मोठी कारवाई

नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांना करारा प्रत्युत्तर

Jammu Kashmir encounter : जम्मू-काश्मीरमधील अखनूरच्या केरी बट्टल भागात शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीत ९ पंजाब रेजिमेंटचे शूरवीर जेसीओ कुलदीप चंद शहीद झाले. सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले आणि संपूर्ण परिसर वेढा घालून शोधमोहीम सुरू केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

किश्तवाडमध्ये ऑपरेशन छत्रूअंतर्गत ३ दहशतवादी ठार (Jammu Kashmir encounter)

किश्तवाड जिल्ह्यातील घनदाट जंगलात सुरू असलेल्या ऑपरेशन छत्रूमध्ये भारतीय लष्कराने मोठा विजय मिळवला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यात टॉप कमांडर सैफुल्लाहचा देखील समावेश आहे. घटनास्थळावरून युद्धजन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे.

शस्त्रसंधीचे उल्लंघन, घुसखोरीचा डाव उधळला

केरी बट्टलमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने तात्काळ कारवाई करत गोळीबार केला. याचवेळी झालेल्या चकमकीत जेसीओ कुलदीप चंद यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

लष्कराकडून शहिदाला मानवंदना

व्हाईट नाईट कॉर्प्सच्या जीओसी आणि सर्व रँक्सनी शहिदाला श्रद्धांजली अर्पण करत म्हटले, “जेसीओ कुलदीप चंद यांनी ११ एप्रिलच्या रात्री नियंत्रण रेषेवर घुसखोरीविरोधी मोहिमेचे नेतृत्व करताना आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या पथकाच्या शौर्यामुळे दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात आला. आम्ही या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.”

#JammuKashmir #IndianArmy #OperationChhatru #TerroristEncounter #KuldeepChand #WhiteKnightCorps #AkhnoorEncounter #Kishtwar