सिंधूदुर्गात मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्याचे लोकार्पण डिसेंबर २०२३ मध्ये झाले होते. अवघ्या ८ महिन्यात हा ३५ फुटांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेचा राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी अटक केले आहे. आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी जयदीप त्याच्या राहत्या घरी आला होता. पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
आपटे हा घटना घटल्यापासून फरार होता. त्यानंतर पोलीसांनी जयदीपच्या शोधासाठी सात वेगवेगळी पथक तैनात केली होती. जयदीप आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. जयदीप सापडत नसल्यामुळे पोलीसांनी लूक आऊट नोटीसही जारी केली होती. यानंतर आज तो सापडला.