मुंबई: भारतीय सैनिकांच्या शौर्याचा इतिहास शब्दबद्ध करण्याची आवश्यकता आहे, असे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. कारगिल युद्धातील Kargil Heroes : कारगिलचे वीर: कॅप्टन यादव यांच्या शौर्याचा राजभवनात गौरव पराक्रमासाठी परमवीर चक्र प्राप्त कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांच्या शौर्याची २५ वी वर्षपूर्ती राजभवन येथे साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी राज्यपालांनी कॅप्टन यादव यांचा सत्कार केला आणि त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी कारगिल युद्धाच्या Kargil Heroes काळात तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा भारतीय सैनिकांवरील अढळ विश्वास अधोरेखित केला. त्यांनी जीवनातील शिस्तीचे महत्त्व पटवून देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एनसीसी’ बळकटीकरणाच्या दृष्टिकोनावरही चर्चा केली.

कॅप्टन यादव यांचे अनुभव आणि सन्मान:
कॅप्टन यादव यांनी कारगिल युद्धातील अनुभव कथन करत, भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची जाणीव उपस्थितांना करून दिली. त्यांच्या विवाहाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने, त्यांच्या पत्नी श्रीमती रीना यादव यांचाही महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार महिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात, Dr. Ashwini Bhide यांचा संदेश वाचण्यात आला. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.