Kasara Ghat Traffic Update | जुन्या कसारा घाटात 2 कंटेनरचा भीषण अपघात, मुंबई-नाशिक महामार्ग ठप्प

Kasara Ghat Traffic Update | 2 containers involved in a serious accident at Old Kasara Ghat, Mumbai-Nashik highway blocked

इगतपुरी | २६ जून २०२५
Kasara Ghat Traffic Updateमुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प! जुन्या कसारा घाटात दोन कंटेनरमध्ये झालेल्या जोरदार धडकेत वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कसारा घाटात काय घडलं?

  • घाटात एक कंटेनर उभा होता
  • मागून आलेल्या दुसऱ्या कंटेनरने दिली जोरदार धडक
  • अपघातानंतर कंटेनर आडवा होऊन संपूर्ण रस्ता झाला बंद
  • महामार्गावरील दोन्ही मार्गांवर वाहतूक ठप्प

महामार्ग पोलीस घटनास्थळी; मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू (Kasara Ghat Traffic Update)

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. टोल प्रशासनाच्या तीन क्रेनच्या साहाय्याने कंटेनर हटवण्याचे काम वेगात सुरू आहे.

वाहतूक लतिफवाडीमार्गे नवीन घाटावर वळवली

सध्या खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक लतिफवाडी येथून नवीन कसारा घाटावर वळवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना:

अनावश्यक प्रवास टाळा
पर्यायी मार्ग वापरा (नवीन कसारा घाट)
वाहतूक पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
वाहनचालकांनी संयम बाळगावा