तिरुअनंतपुरम, केरळ – केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या आजीसह कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या (massacre) केली. विशेष म्हणजे, यामध्ये त्याच्या प्रेयसीचाही समावेश आहे. सोमवारी (२४ तारखेला) ही घटना उघडकीस आली, जेव्हा आरोपी अफान याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलिसांसमोर थरारक कबुली
पेरुमला येथील रहिवासी असलेल्या अफानने सायंकाळी वेंजारामृडू पोलीस ठाण्यात येऊन आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या (Massacre) केल्याचे कबूल केले. या घटनेमुळे पोलिसही सुन्न झाले. मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- सलमा बिवी (आजी)
- अहसान (भाऊ)
- फरशाना (प्रेयसी)
- लतीफ (काका)
- शाहिदा (काकू)
पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन पाहणी केली असता, कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह आढळले.
हत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही
अफानने हे पाच खून का केले? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, तो नुकताच परदेशातून व्हिजिटिंग व्हिसावर परतला होता. त्याचे वडील सध्या परदेशात आहेत. खून केल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र तो यातून बचावला.
सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता परिसरातील नागरिकांनी त्याला पेरुमला भागात पाहिले होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.