नाशिक/प्रतिनिधीः- नाशिक मधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी गावातील राजवाडा येथे रविवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजे दरम्यान विल्होळी येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नंदेश साळवे याच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने नंदेश साळवे हा गंभीर जखमी झाला, जखमी अवस्थेत नंदेशला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी गावातील राजवाडा येथे रविवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजे दरम्यान विल्होळी येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नंदेश साळवे याच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवला ज्यामध्ये नंदेश साळवे हा गंभीर जखमी झाला, जखमी अवस्थेत नंदेशला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितां विरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने एका संशयीतास ताब्यात घेतले असून लवकरच इतर आरोपींनाही पकडण्यात येईल आणि खुनाचा उलगडा केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ..