नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी Kumbhamela सिटीलिंकने जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिका हद्दीपासून गोदाघाटापर्यंत प्रवाशांची सोय करण्यासाठी विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. या कुंभमेळ्यासाठी सिटीलिंकने साडेतीन कोटी रुपयांचा व्यापक आराखडा तयार केला आहे. शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाल्यास, भाविकांसाठी मोफत वाहतुकीची सुविधा पुरवण्याची तयारी सिटीलिंकने दर्शवली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गेल्या कुंभमेळ्यातील Kumbhamela अनुभव लक्षात घेता, यावेळी विशेष नियोजन करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील अंतर्गत वाहतुकीसाठी २५०-३०० बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बससेवेमुळे भाविकांना सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Kumbhamela मोफत वाहतूक: निर्णय शासनाच्या हातात
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वाहतुकीसाठी केंद्र किंवा राज्य शासनाने निधी दिल्यास, भाविकांसाठी मोफत वाहतूक सुविधा पुरवली जाईल. यासाठी सिटीलिंकने आराखड्यात विशेष तरतूद केली आहे. मात्र, शासनाकडून निधीची प्रत्यक्षात पूर्तता झाल्यावरच हा प्रस्ताव राबवला जाईल, असे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी स्पष्ट केले आहे.
तपोवन डेपो स्थलांतरित होणार
कुंभमेळ्याच्या Kumbhamela काळात तपोवनातील सिटीलिंक डेपो अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी टाळता येईल, असे प्रशासनाचे मत आहे.
राज्य परिवहन महामंडळाची भूमिका
राज्य परिवहन महामंडळाने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी सेवा पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. विशेषतः दिंडोरीसारख्या भागांतून प्रवासी वाहतूक करण्याचे नियोजन आखले आहे. मात्र, महापालिका हद्दीतील वाहतुकीची जबाबदारी सिटीलिंकवरच राहणार आहे.
भाविकांसाठी सुव्यवस्थित सेवा
गेल्या कुंभमेळ्यातील अडचणी टाळण्यासाठी यावेळी रस्ते वाहतूक सुचारू ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. भाविकांना पायी चालण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घेतली जाईल.