नाशिक महानगरपालिका, नाशिक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पर्यावरण विभाग.
०२ सप्टेंबर २०२४
प्रेस नोट
महानगरपालिकेच्या वतीने या वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करताना नाशिक महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आज सातपूर व नवीन नाशिक येथील विभागीय कार्यालय येथे माफक दारात शाडू माती व भक्ती संगम मातीची पर्यावरण पूरक मूर्ती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव मूर्तीचे स्टॉल करिता मनपाच्या माध्यमातून मूर्तिकार यांना मोफत जागा उपलब्ध करून दिली असून नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने पर्यावरण पूरक मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी केले आहे.
ना नफा ना तोटा या तत्वावर मूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पर्यावरण पूरक मूर्ती विक्रत्यांनी माहिती दिली.