महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे. सर्वाधिक जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे.
भाजपने 127 जागांवर विजय मिळवल्यानंतर भजप नेते सागर बंगल्यावर जमण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या कार्यलयाबाहेर कार्यकर्त्यांचा विजय जल्लोष सुरु झाला आहे. वर्षा बंगल्याच्या बाहेर देखील कार्यकर्ते जमले आहेत.
महाराष्ट्रात भाजप महायुतीची त्सुनामी पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला महाराष्ट्राच्या इतिहासातलं मोठं बहुमत मिळालं आहे…
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून दिसून आलं.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.