मुंबई, ऑक्टोबर: पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १,४९२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीच्या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी १,४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.” प्रधानमंत्री मोदी शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ म्हणून संबोधतात आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे मत आहे.