Maharashtra Rural Education Update : राहूडच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच मिळाली एसटी बस सेवा; गावकऱ्यांचा आनंद ओसंडला

download 60

Chandwad, Nashik News : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राहूड गावातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच एसटी महामंडळाची बस सेवा (ST Bus Service) मिळाली आहे. राहूड ते नांदूरटेक शेडवस्ती दरम्यान ही सेवा सुरू झाल्याने, परिसरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून गावात बस येताच विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी बसचे औक्षण करून चालक आणि वाहकाचा सत्कार केला. (Maharashtra Rural Education Update)

Rural School Transport Maharashtra या उपक्रमांतर्गत ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राहूडसह नांदूरटेक, शेडवस्ती, मैफत वस्ती, मांगीर बेट अशा सात ते आठ गावातील विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

शाळेपर्यंतच्या प्रवासाचा प्रश्न सुटला

पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संचालित राहूड माध्यमिक विद्यालय हे तालुक्यातील एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र आहे, जिथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण दिलं जातं. याआधी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत होता. ही गैरसोय लक्षात घेऊन पालकांनी माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्याकडे बससाठी मागणी केली होती.

श्री. कोतवाल यांनी मनमाड आगारप्रमुखांशी बैठक घेऊन हा प्रश्न मांडला आणि त्यानंतर दुगाव मार्गे नांदूरटेक अशी नवीन बससेवा मंजूर झाली. ही बस आता दररोज सकाळी १०.३० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता धावणार आहे.

स्थानिकांचा सहभाग आणि समाधान (Maharashtra Rural Education Update)

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रमेश पवार, वाल्मीक पवार, खंडू सोमवंशी, आनंदा पवार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ठाकरे आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या नव्या सेवेमुळे शिक्षण क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.