Mahavikas Aghadi conflict : महाविकास आघाडीतील तणाव: नाशिकच्या तीन प्रमुख मतदारसंघांवर बिघाडीची ठिणगी

mahavikas-aghadi-conflict-nashik-constituency-dispute-niphad-deolali

Latest News : महाविकास आघाडी मध्ये नाशिकमधील तीन प्रमुख मतदारसंघांवरून निर्माण झालेली बिघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी बनत आहे. नाशिक मध्य, निफाड, आणि देवळाली या तीन मतदारसंघांवरून शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात तणाव वाढला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक मध्य मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते निवडणुकीसाठी तयारी करत आहेत, परंतु काँग्रेसने या जागेवर आपला हक्क सोडण्यास नकार दिला आहे. देवळालीमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची जागेवरून हट्ट असल्यामुळे शिवसेनेच्या माजी आमदार योगेश घोलप यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निफाडमध्येही ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

या तिन्ही जागांवरील मतभेदांमुळे मविआतील मतभेद तीव्र झाले आहेत, आणि त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अंतर्गत ताणतणाव अधिकच उफाळून येऊ शकतो