महाराष्ट्रातील निवडणुकीत ईव्हीएम EVM घोटाळ्याचा आरोप: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर इंडिया आघाडीने गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की ईव्हीएमच्या EVM माध्यमातून महायुतीने निकालांमध्ये फेरफार केली असून, भाजपा नेतृत्वाखालील महायुतीला प्रचंड बहुमत मिळवण्यासाठी हे कारस्थान रचले गेले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महाविकास आघाडीची ठोस भूमिका
इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी या मुद्द्यावर एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) नेते प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले की, “निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास डळमळीत होऊ नये, यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत.”
महत्वाच्या बैठकीत मोठा निर्णय
शरद पवार, अरविंद केजरीवाल, आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
२० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या, ज्यामुळे ईव्हीएममध्ये घोटाळ्याचा आरोप केला जात आहे.
सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्याची तयारी
या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत असून, न्यायालयीन निर्णय हा देशभरात चर्चेचा विषय ठरणार आहे.
आघाडीचा निर्धार: “लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढू,” असा निर्धार इंडिया आघाडीने व्यक्त केला आहे.
राजकीय वातावरण तापले: महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडींमुळे वातावरण अधिक तापले असून, पुढील कायदेशीर लढाईवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
He pan Wacha : BJP : बच्चू कडू : “मी शिंदेंना सांगितलं होतं की भाजपाकडून…” मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य!