राज्यात महायुतीचे mahayuti सरकार स्थापन होऊन महिना झाला आहे. मात्र, ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी धाडसी विधान करत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला खुले आव्हान दिले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
ईव्हीएम वाद: “बारामती आणि माळशिरसची पोटनिवडणूक बॅलेटवर घ्या!”
उत्तम जानकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ईव्हीएमवर गंभीर शंका उपस्थित केल्या. “गेल्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी घोळ झाला. बारामतीत अजित पवार 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचा दावा आहे, तर जयकुमार गोरे 13 हजार मतांनी पराभूत झाले,” असे ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या “ईव्हीएम हॅक करा, प्रॉपर्टी भेट देतो” या विधानावर प्रतिक्रिया देत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.
“मी आणि अजित पवार राजीनामा द्यायला तयार”
उत्तम जानकर यांनी मोठे आव्हान करत सांगितले की, “मी आणि अजित पवार एकत्र राजीनामा देऊ, आणि बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेऊ. मग पाहू, अजित पवार 10 हजार मतांनी तरी निवडून येतात का!”
सरकारच्या पतनाचा दावा
“आठ दिवसांपूर्वी मी महायुती mahayuti सरकारला चार महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. आता तीन महिने 26 दिवस बाकी आहेत. हे सरकार 1000 टक्के पडणार, हे मी पुराव्यांसह सिद्ध करेन. ज्यावेळी देशासमोर सत्य उघड होईल, तेव्हा या सत्ताधाऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरणार नाही,” असे जानकर म्हणाले.
राजकीय वर्तुळात चर्चा
उत्तम जानकर यांच्या या विधानांमुळे राजकीय वातावरण तापले असून, त्यांचे पुरावे आणि महायुती सरकारचे भवितव्य काय, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.