महिलांचे आजचे राशीभविष्य

rashibhavishy

शनिवार, *14* *सप्टेंबर 2024*. भाद्रपद शुक्ल एकादशीराहुकाळ – सकाळी 9 ते 10:30 *आज जन्मलेल्या बाळाची विष्टी करण शांती करून घेणे*आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे”

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

*परिवर्तीनी एकादशी* 14 सप्टेंबर रोजी

जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला चांगले असून लोकप्रिय असतात. दुसऱ्याला न दुखावता सहकार्य करण्याकडे कल असतो .तुम्ही हातचे राखून बोलता तुम्ही चाणाक्ष असून निरीक्षण उत्तम असते. कोडी सोडवण्याचा छंद असतो. वैवाहिक जीवन सुखी असते. परंतु मुली होण्याबाबत व प्रसूतीबाबत त्रास संभवतो. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते .भावनांवर ताबा ठेवता. लग्नानंतर भाग्योदय होऊन श्रीमंत व्यक्तीशी लग्न होते .गुढ विद्येची आवड असली तरी सखोल ज्ञान मिळवण्याची वृत्ती असते. त्यामुळे तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते.तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असते .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असता. पतीशी जुळवून घेण्यात तरबेज असता. तुम्ही आरोग्याने सुदृढ असून, रूढी बद्दल आयुष्य तुम्हाला आवडत नाही. स्वभावाने नम्र असतात. पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असतो. घरातली टापटीप,व्यवस्थित पणा ठेवणायची कामे दुसऱ्यांकडून करून घेण्यात वाकबगार असता.वाचनाची आवड असून वक्तृत्व ,ज्ञान ,बौद्धिक बैठक आहे ,कला, प्रवास यांचे आवड आहे ,अशा लोकांकडे जाणे येणे तुम्हाला आवडते.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*आजचे राशीभविष्य*

मेष:-मैत्रिणींनो आज कामाच्या ठिकाणी उत्तम लाभ होतील. अचानक एखादी खूष खबर मिळेल. दागिने खरेदी होईल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज प्रवासातून लाभ होतील. लक्ष्मीची कृपा राहील. उच्च शिक्षण घेणार्यांना अनपेक्षित यश मिळेल.

मिथुन:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थनी चंद्र आहे.सासुरवाडी कडून लाभ होईल, अचानक एखादी सुखद घटना घडेल. खरेदी होईल. प्रवास होतील.

कर्क:-मैत्रिणींनो आज पतीकडून लाभ होईल.जलपर्यटन होईल. हरवलेली वस्तू सापडेल.

सिंह:-मैत्रिणींनो आज झटपट कामाला लागा, वेळ दवडू नका. कनिष्ठ सहकार्य करतील.

कन्या:- मैत्रिणींनो आज उत्तम दिवस आहे. जितकी जास्त मेहनत तितका लाभ होईल. मित्र मंडळी भेटतील. प्रवास होतील.संतती कडून छान बातमी मिळेल.

तुळ:-मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. शेती व्यवसायात लाभ होईल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज भावंडांचे मार्फत लाभ होईल. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.

धनु:-मैत्रिणींनो आज द्वितीय चंद्र आहे. बोलण्यातून अनपेक्षित लाभ होतील. सुदृढ रहाल . मस्त खरेदी होईल.

मकर:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. खूष राहाल. मेजवानी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. अध्यात्मिक लाभ होतील. अनपेक्षित लाभ होतील.

कुंभ:- मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चंद्र आहे. पाण्यापासून होणाऱ्या आजारापासून सावध रहा. परदेश माध्यमातून लाभ होईल.

मीन:- मैत्रिणींनो आज प्रश्न सुटतील, अडचणी दूर होतील. मैत्र मंडळींकडून लाभ होईल

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक ..मोब – 9272311600 लग्न ,करिअर, विवाह गुण मिलन विषयी सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

Leave a Reply