महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत अव्वल स्थान राखले आहे.

Screenshot 2024 09 07 114653

महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत अव्वल स्थान राखले आहे. एप्रिल ते जून 2024 या तिमाहीतील देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल 52.46 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत आपले स्थान पक्के केले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

WhatsApp Image 2024 09 07 at 04.18.10 815129b9

एप्रिल ते जून 2024 या तिमाहीत महाराष्ट्रात एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तर देशभरातील एकूण गुंतवणूक 1,34,959 कोटी रुपये होती. कर्नाटक (19,059 कोटी), दिल्ली (10,788 कोटी), तेलंगणा (9,023 कोटी) आणि गुजरात (8,508 कोटी) या राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत महाराष्ट्राने मोठा टप्पा गाठला आहे.

2014 ते 2019 दरम्यान, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने 3,62,161 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली होती. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे.

Leave a Reply