पंचवटी, नाशिक (दि. १५):
गोदावरी नदीकाठच्या रामकुंडावर मंगळवारी भल्या पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. नववर्षातील पहिला सण मकर संक्रांती Makar Sankranti उत्साहाने साजरा करण्यासाठी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील भाविकांनी पंचवटीत हजेरी लावली. देवदर्शन, गंगास्नान, वाण वाहण्याची परंपरा आणि धार्मिक विधींनी रामकुंड परिसर मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप धारण करत होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भाविकांची अलोट गर्दी
पहाटेपासूनच महिला भाविक गंगास्नानासाठी रामकुंडावर जमू लागल्या. गंगा-गोदावरीत स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते, असा विश्वास असल्याने, स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. महिलांनी गव्हाच्या ओंब्या, तिळाचे लाडू, हिरवे हरभरे, मातीची बोळके, बोर, गाजर, आणि उसाचे तुकडे वाण म्हणून देवाला अर्पण केले.
वाहतूक कोंडी आणि पोलिसांचा बंदोबस्त
गंगाघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. म्हसोबा महाराज आणि गौरी पटांगण परिसरातील वाहनतळ गर्दीने फुलून गेले. गर्दी नियंत्रणासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मिनी कुंभमेळ्याचा अनुभव
सकाळी रामकुंडावर स्नान, पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर भाविकांनी काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, आणि देवी मंदिर येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. “२५ हजारांहून अधिक भाविकांनी आज गंगास्नान केले,” असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
Makar Sankranti संक्रांतीचा धार्मिक महत्त्व
मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, यालाच धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. गंगास्नान, दानधर्म आणि वाणांचे आदानप्रदान यामुळे पंचवटीचा परिसर धार्मिक उर्जेने भारलेला दिसला.
भाविकांच्या उत्साहाने नाशिकच्या पंचवटीत मकर संक्रांतीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला.