श्रीमद महावाक्य निर्वचन( थोरले प्रकरण) सोहळ्याची मुहूर्तमेढ मंडप उभारणी सोहळा संतांच्या उपस्थितीत संपन्न.

श्रीमद महावाक्य निर्वचन( थोरले प्रकरण) सोहळ्याची मुहूर्तमेढ: मंडप उभारणी सोहळा संतांच्या उपस्थितीत संपन्न

नाशिक जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन (थोरले प्रकरण) अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळ्याची मुहूर्तमेढ मंडप उभारणीचा सोहळा कुलाचार्यांच्या व संतांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

ध्वजारोहण व मुहूर्तमेढ मंडपाची स्थापना कुलाचार्य कुलभूषण कवीश्वर आचार्य यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आली. यानंतर आयोजित धर्मसभेला दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी कवीश्वर कुलाचार्य श्री खामणीकर बाबा होते.

या प्रसंगी उपस्थित प्रमुख संतांमध्ये उपाध्य कुलाचार्य बिडकर बाबा रणाईचे, कुलाचार्य खामणीकर बाबा कानाशी, कुलाचार्य लासुरकर बाबा जाळीचा देव, कुलाचार्य करांजेकर बाबा अमरावती, कुलाचार्य विध्वंस बाबा शास्त्री फलटण , कुलभूषण माहूरकर बाबा माहूरगड, कुलभूषण श्रीपुजदेकार बाबा, आश्चर्य श्री अंकुळनेरकर बाबा चांदोरी, आचार्य सुकेनकर बाबा सुकेना, आचार्य दीपराज गुर्जर बाबा आदींचा समावेश होता.

संतांनी प्रवचनात श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, “परमेश्वर हा आपल्या देहामध्येच आहे, त्यामुळे चांगले कर्म करावे, अन्नदान करावे आणि धर्मवाढीसाठी पुढाकार घ्यावा.”

या पोथी वाचनाचा शुभारंभ रविवार, 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून, सव्वा महिन्याचा कालावधीत हे वाचन पार पडणार आहे. हा सोहळा जाखुरी रस्ता, कोटमगाव येथील प्रकाश शेठ घुगे यांच्या शेतात आयोजित करण्यात आला आहे,

कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश शेठ दत्तात्रय घुगे, संचालक व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था, नाशिक रोड देवळा व्यापारी बँक संचालक यांनी सर्व संत व कुलाचार्यांचे पूजन केले. यावेळी श्रीकृष्ण बाबा मराठे यांनी सोहळ्याविषयी संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.

प्रकाश शेठ यांनी यावेळी सांगितले की, “आमचा परिवार महानुभाव पंथाचा उपासक आहे. गेला तीन-चार पिढ्यांपासून आम्ही धर्माची निष्ठा जोपासत आलो असून, पुढील पिढ्यांनीही या परंपरेचा आदर करावा.”

या सोहळ्याला माजी नगरसेवक दिनकर पाटील, व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, बांधकाम व्यावसायिक संदीप कर्नावटकर नेहमीचंद कोचर, निवृत्ती चाफळकर, शरद घुगे अशोक घुगे अंबादास घुगे भूषण घुगे किरण घुगे तसेच पंचकोशीतील ग्रामस्थ आणि नाशिक जिल्ह्यातील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले की, “श्रीमद महावाक्य निर्वचन (थोरले प्रकरण) अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळ्यात उपस्थित राहून धर्मकार्याचा लाभ घ्यावा.”