Manikrao kokate : माणिकराव कोकाटे: पालकमंत्रिपदावर दावा कायम, नाशिकसाठी स्थानिक नेतृत्वाची मागणी

माणिकराव कोकाटे: पालकमंत्रिपदावर दावा कायम, नाशिकच्या विकासासाठी स्थानिक नेतृत्वाची मागणी

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao kokate यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर आपला दावा कायम असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक नेतृत्वानेच जिल्ह्याचा विकास करावा, अशी जनतेची अपेक्षा. क्रीडा क्षेत्रासाठी लवकरच नाशिकमध्ये बैठक.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक: शेतकरी कर्जमाफीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे स्पष्ट करत, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao kokate यांनी पालकमंत्रिपदासाठी आपला दावा कायम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या जागा अधिक असल्याने पालकमंत्रिपद स्थानिक नेत्यालाच मिळावे, ही जनतेची अपेक्षा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी (दि. २५) कालिकादेवी मंदिर संस्थानच्या सभागृहात विविध क्रीडा संघटनांच्या वतीने कोकाटेंचा सत्कार करण्यात आला. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “पालकमंत्री स्थानिक असल्यास जिल्ह्याच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे हाताळल्या जातात. स्थानिक नेत्यांना जनतेच्या प्रश्नांची आणि जिल्ह्याच्या गरजांची सखोल माहिती असते.”

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल उचलले
कोकाटे यांनी नाशिकमध्ये क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याची घोषणाही केली. त्यांनी नाशिकमधील युवा खेळाडूंना संधी आणि संसाधनं पुरवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

“वरिष्ठांचे निर्णय मान्य, पण स्थानिकांच्या अपेक्षा महत्त्वाच्या”
शेतकरी कर्जमाफीच्या योजनेबाबत आपले स्पष्ट मत मांडताना कोकाटे म्हणाले, “कोणती योजना चालवायची आणि कोणती थांबवायची, हा निर्णय वरिष्ठांचा आहे. मात्र, पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर स्थानिकांची भावना आणि निष्ठा लक्षात घेऊन योग्य निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.”

राजकीय वर्तुळात कोकाटेंच्या या वक्तव्यामुळे नाशिकमधील पालकमंत्रिपदाच्या शर्यतीला नवा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.