Manikrao kokate : “धक्कादायक! नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा – 2000 शेतकरी संकटात”

Manikrao kokate

बागलाणमध्ये 1,298 हेक्टर शेतीपिकांचे नुकसान, 2000 शेतकरी संकटात

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Manikrao kokate : नाशिक जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यात सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे 1,298 हेक्टर क्षेत्रातील शेतीपिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे जवळपास 2000 शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी नाशिकमध्ये

नाशिकचे पालक मंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) हे अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मदतीची आशा आहे.


केशर आंब्यावर पावसाचा दणका: आंबा उत्पादक संकटात

हरसूल परिसरात शेकडो एकरवरील आंबा लागवडीवर पावसाचा परिणाम

हरसूल आणि आजूबाजूच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची लागवड करण्यात आली होती. काही झाडांवर फळ धरण्यास सुरुवात झाली होती, तर काही झाडांचा माल बाजारात यायला फक्त काही दिवस बाकी होते. अशा वेळी आलेल्या पावसामुळे आंबा उत्पादकांच्या हातातील माल खराब झाला आहे.


रानमेवाचा हंगाम धोक्यात: रायवळ आंबा, जांभूळ, करवंदे होणार दुर्मीळ

आदिवासी बांधवांना रोजगाराचा फटका

अवकाळी पावसामुळे यंदाचा रानमेवाचा हंगाम संकटात आहे. रायवळ आंबा, जांभूळ आणि करवंदे यांचा पुरवठा कमी होणार आहे. आदिवासी बांधवांसाठी हे फळे पावसाळ्यापूर्वीचा एक मुख्य रोजगाराचा स्रोत असतो. यावर्षी मात्र त्यांनाही मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.


कांदा, डाळिंब, गहू, हरभरा आणि भाजीपाला – सर्व पिके संकटात

बागलाणमध्ये ८५ मिमी पावसाची नोंद; कांदा शेतातच भिजला

बागलाण तालुक्यात ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उन्हाळी कांदा पिकावर सर्वाधिक परिणाम झाला असून, अनेक शेतकऱ्यांचा शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने खराब झाला आहे. परिपक्व कांदाही जमिनीतच कुजण्याची शक्यता आहे.

भाव कोसळण्याचा धोका

शेतकरी आता शेवटचा उपाय म्हणून माल बाजारात नेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अचानक आवक वाढल्यास कांद्याचे भाव गडगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शेतकऱ्यांचे सरकारकडे एकच मागणं – तातडीने मदत जाहीर करा!

शेतकऱ्यांचे पीक गेल्यानंतर आता त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.