Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग Manmohan Singh यांचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. 2004 ते 2014 या काळात पंतप्रधान होते. काँग्रेसचे नेतृत्वाखाली तयार झालेल्या युपीए सरकारचे त्यांनी नेतृत्व केले. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी आत्ता पाकिस्तामध्ये असणाऱ्या पंजाबमधील गाह येथे झाला. त्यांच्या वडीलांचे गुरुमुख सिंग तर आईचे नाव अमृत कौर होते. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब अमृतसर येथे आले. मनमोहन सिंग Manmohan Singh यांचा 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग या तीन मुली आहेत.1966 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
1966 ते 1969 पर्यंत UNCTD सोबत काम
1969 ते 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक म्हणून काम
ललित नारायण मिश्रा यांची विदेश व्यापार मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार
1976 मध्ये अर्थ मंत्रालयात सचिव
1976 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक
1976 ते 1980 या कालावधीत मनमोहन सिंग Manmohan Singh भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते.
1976 ते 1980 या कालावधीत भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक
1982 ते 1985 पर्यंत RBI चे गव्हर्नर
1985 ते 1987 या कालावधीत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष
1987 ते 1990 पर्यंत मनमोहन सिंग यांनी दक्षिण आयोगाचे महासचिव
1991 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले.
2004 ते 2014 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते
हे पण वाचा: Shyam Benegal : 90 वर्षांचे प्रवास संपला: श्याम बेनेगल यांची सिनेमॅटिक कहाणी अमर