Rice Water benefits for Health: गावठी तांदळाच्या पाण्याचे (निवळ) पेजेचे आरोग्यदायी फायदे

marathi-health-tips/rice-water-benefits-for-health-rice-water-is-very-beneficial-for-health-know-its-benefits

१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते.
२) तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.
३) तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास
रक्ताची कमतरता दूर होते.
४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
५) तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
६) केळे व तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात,
७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.
८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास
डायजेशन सुधारते.
९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते, त्यामुळे उर्जा मिळते, बाहेर जातांना पिऊन जावे, दिवसभर ताजेतवाने वाटते.
१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी, आजारपणात आलेली कमजोरी दूर होते.
११) उच्च रक्तदाब कमी होतो. तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमी होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.
१२) तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मुलायम होतो, काळे डाग निघून जातात.
१३) केसांकरता उत्तम टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमी, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते
दुतोंडी केसांची समस्या दूर होते, कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.
१४) तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशी आटोक्यात राहतात.
१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
२६) डायेरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळी तांदळाची पातळ पेज प्यायला द्यावी. ताकद येते.
१७) सर्दी, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये
तांदळाचे पाणी प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गावठी तांदळा ची पेज खूप च पौष्टिक आहे , एकेकाळी गोवा व कोकणात सकाळ च्या न्याहरी सोबत घेतली जायची.

*गावठी तांदूळ गोव्यात- कोकणात मिळतो च तसेच आता बाजार पेठेतही सहज शक्य झाला आहे **

पूर्वी आजारी पेशन्टना गावठी तांदळाची पेज दिली जायची त्या मागची कारणे पोस्ट मध्ये मांडली आहेतच.