आरती आणि क्लॅपिंग थेरपी (Clapping Therapy)

आरती आणि क्लॅपिंग थेरपी (Clapping Therapy)

देवाची आरती करताना किंवा उत्साहाच्या क्षणी आपण आपसुकच टाळ्या वाजवतो. या टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होत असल्याचं समोर आलं आहे. म्हणून या प्रकाराला ‘क्लॅपिंग थेरपी’ असं म्हटलं जातं.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

म्हणून मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी काही वेळा डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात येतो.

मानवी शरीरात ३४० प्रेशर पॉइंट्स असतात.
त्यापैकी २७ हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. त्या प्रेशर पॉइंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होतात.

क्लॅपिंग थेरपी

» खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यांसमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरतो.

» सकाळच्या वेळेस २०-३० मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फिट आणि अ‍ॅक्टिव्ह राहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा कोलेस्टरॉल त्रासही कमी होतो असा सल्ला डॉक्टर देतात.

टाळी वाजवल्यानंतर कोणत्या ५ अ‍ॅक्युपंक्चर पॉइंट्स् ना चालना मिळते ?

» हँड वॅली पॉइंट (Hand valley point)

» बेस ऑफ थंब पॉइंट अर्थात अंगठय़ाच्या खालचा भाग (Base of thumb point)

» रिस्ट पॉइंट – मनगट (Wrist point)

» इनर गेट पॉइंट (Inner gate point)

» थंब नेल पॉइंट – अंगठय़ाचं नख (Thumb nail point)

या पाच पॉइंट्स् ना चालना दिल्यास खालील फायदे होतात. हे फायदे पुढीलप्रमाणे –

» हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.

» पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.

» गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.

» लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.

» टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.

» क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.

» क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.

» क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.

» मधुमेह, आर्थरायटीस्, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.

» सतत एसीमध्ये बसून काम करणाऱ्यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होत.

मग कराल ना रोज आरती ती ही छान टाळ्या वाजवून. . !!!!

Leave a Reply